Marathi (204)
Tutor Marked Assignment
20% Marks Of Theory
प्र. १ खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर ४० ते ६० शब्दांमध्ये लिहा.
अ) आपल्या भाषेच्या विकासासाठी लो. टिळक कोणते मार्ग सुचवितात?
ब) अंधार वाहून वाहून कोण पोक्या झाले?
प्र.२ खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर ४० ते ६० शब्दांमध्ये लिहा.
अ) आचार्य विनोबाजींचे मते आईचे मातृत्व नेमके कशात आहे?
ब) 'पहा टाकले पुसुनी डोळे' कवितेत कवयित्री या देशाच्या मातीची महती कशी सांगत आहे?
प्र.३ खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर ४० ते ६० शब्दांमध्ये लिहा.
अ) महान कार्य यशस्वी होण्यासाठी राजाने कसे वागले पाहिजे?
ब) ज्ञानेश्वरांनी देवाकडे कोणते दान मागितले आहे?
प्र. ४ खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर १०० ते १५० शब्दांमध्ये लिहा.
अ) डॉ. ह्यूम यांनी टिळक कुटुंबियांसाठी रेल्वेचा डबा का रिझर्व केला?
ब) 'या जगण्यावर शतदा प्रेम करावे' असे कवीला का वाटते?
प्र. ५ खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर १०० ते १५० शब्दांमध्ये लिहा.
अ) वि.स. खांडेकरांना कोणत्या गोष्टींनी आनंद होतो?
ब) 'भाषण' या भाषिक कौशल्याची वैशिष्टये सांगा?
प्र. ६ खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर ५०० शब्दांमध्ये प्रकल्प तयार करा.
अ) भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे देशभक्त आणि त्यांचे कार्यविषयक सचित्र माहिती- पुस्तिका तयार करा.
ब) वर्तमानपत्रामध्ये वृत्तलेखन अथवा बातम्या लिहिताना कोणत्या प्रमुख गोष्टींची आवश्यकता आहे त्याविषयक माहिती तक्ता तयार करा.